आजारी मनाचा टाहो

रोजचं वर्तमानपत्र उघडलं की किमान एका आत्महत्येची बातमी त्यात असते. आपण ती वाचतो. त्या माणसाशी आपलं काही नातं नसेल तर फक्त चुकचुकतो. नातं असेल तर अस्वस्थ होतो. त्या व्यक्तीनं आत्महत्येचा मार्ग का स्वीकारला असेल असा विचार करत राहतो. आपल्याला अनेक कारणं सुचतात, त्यापैकी त्या व्यक्तीच्या संदर्भात यातलं कुठलं असेल, ह्याचा मनोमन अंदाज करतो.  दु:खातिरेकानं अनेक... Continue Reading →

शिकवू इच्छिणार्‍यांना ‘आनंदाने शिकण्याच्या दिशेने’ नेणारे पुस्तक 

आपल्या मुलांचे शिकणे अर्थपूर्ण व्हावे असे जगातल्या सर्वच मोठ्या माणसांना वाटते. त्यासाठी शिकण्याची प्रक्रिया ‘मूल’केंद्री असणे, मुलाच्या आजच्या आणि उद्याच्या जगण्याशी जोडलेली असणे आणि महत्त्वाचे म्हणजे ती आनंददायी असणे आवश्यक आहे हे आपण सारेच मानतो. काही प्रयोगशील शाळांचा अपवाद वगळता शिकण्यासाठी असलेल्या सध्याच्या व्यवस्थेत आपली बहुतांश मुले अर्थपूर्ण, सर्जनशील व आनंददायी शिक्षणापासून वंचित आहेत हेही... Continue Reading →

संवादसेतू…

मयूर दंतकाळे हे के. पी. गायकवाड हायस्कूल, बादोले, ता. अक्कलकोट, जिल्हा सोलापूर येथे गेली १० वर्षे कलाशिक्षक आहेत. गेल्या ६ वर्षांपासून ते शाळेत पत्रलेखन उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांकडून ते लेखक, शास्त्रज्ञ, चित्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पत्र लिहून घेऊन पाठवतात. आजवर मुलांना ३००० पत्रोत्तरे आली आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी स्वतः मुलांना १५० पत्रे पाठवून संवाद सुरू... Continue Reading →

आदरांजली – विरुपाक्ष कुलकर्णी

ज्येष्ठ अनुवादक विरुपाक्ष कुलकर्णी ह्यांचे मध्यंतरी निधन झाले. संरक्षण खात्याच्या हाय एक्सप्लोजिव्ह कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनीअर म्हणून काम ही त्यांची व्यावहारिक, तर साहित्यप्रेम ही सर्जक बाजू म्हणायला पाहिजे. विरुपाक्ष ह्यांचे मराठी आणि कानडी अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व होते. मराठीतील अभिजात साहित्य कानडी वाचनप्रेमींपर्यंत पोचवण्याच्या ओढीतून त्यांनी मराठीत गाजलेल्या दर्जेदार पुस्तकांचा अनुवाद करायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या... Continue Reading →

जिद्द डोळस बनवते

माझे नाव विद्या वाय. मी बंगळुरू येथे राहते.मी जन्मांध आहे. माझा जन्म नऊ महिने पूर्ण होण्याआधी म्हणजेच प्रिमॅच्युअर झाला. ‘रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी’ असे या अवस्थेला म्हटले जाते. वेळेआधी प्रसूती झाल्यास कधी कधी डोळ्याच्या पडद्याला रक्तपुरवठा करणार्‍या नलिकांमध्ये दोष निर्माण होतो.तसेच माझ्या बाबतीत झाले. माझे बालपण बंगळुरूजवळील एका खेड्यात गेले. तीन महिन्यांपर्यंत मी अंध असल्याचे माझ्या... Continue Reading →

हे मावशीच करू जाणोत

मावशी गेल्या. ह्या वाक्याचा आवाका काय आहे तो अजून नीटसा उमगलाय असं वाटत नाही. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीत कधीच न भरून येणारी ती तथाकथित पोकळी निर्माण झालीच असेल; पण आम्हा सगळ्या भाचरांच्या आयुष्यातली मावशींची जागा भरून निघणं आता अशक्यच. सुमित्रामावशींचं वलयांकित व्यक्तिमत्त्व आणि त्यांचा प्रवास बहुतेक सिनेरसिकांना परिचयाचा असेलच; पण त्यामागचं माणूसही तितकंच अद्भुत होतं असं... Continue Reading →

संवादकीय – मे २०२१

कोविड महामारीचा दबाव कमी होतोय, आयुष्य नॉर्मल होतेय असं वाटत होतं तोवर दुसरी लाट आली. अधिक जोरकस आणि सर्वदूर पसरणारी. समाजातल्या सर्व थरात, सर्व घरात अस्वस्थ, असहाय्यता भरून राहिली आहे. प्रत्येकाच्या घरातलं, कुटुंबातलं, निदान परिचयातलं कुणीतरी या महामारीनं खाल्लेलं आहे. आर्थिक अवनती तर एवढी मोठी झालेली आहे की पुन्हा मूळपदाला यायला अनेक वर्षं जावी लागतील.... Continue Reading →

चिकूpiku

... १ ते ८ वयोगटातील मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे मासिक रोज उठून मुलांना कोणत्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी कुठले खेळ खेळायचे, कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटीज करायच्या, हा बऱ्याच आईबाबांपुढचा यक्षप्रश्न असतो. म्हणजे काही तरी करण्याची इच्छा तर खूप असते; पण नक्की काय करायचं हे सुचत नाही. लहान मुलांच्या मेंदूचा शिकण्याचा वेग प्रचंड असतो. अशा वेळी मुलांना नवनवीन अनुभव... Continue Reading →

पुस्तक परिचय – अनारको के आठ दिन

अनारको के आठ दिन  |    लेखक: सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु    |    प्रकाशक: राजकमल प्रकाशन, नवी दिल्ली सतीनाथ षडंगी उर्फ सत्यु सामाजिक कार्यकर्ते आहेत. खखढ वाराणसीहून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. 1984 साली भोपाळ दुर्घटनेनंतर मदतीसाठी ते भोपाळला गेले आणि तिथेच राहिले. तेथील पीडित लोकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी संभावना ट्रस्टची स्थापना केली... Continue Reading →

गुजगोष्टी भाषांच्या

एखाद्या प्रांतात तिथली भाषा ज्या प्रकारे बोलली जाते, तोच त्या भाषेचा शुद्ध प्रकार तिथल्या लोकांना वाटतो, ते साहजिकच आहे, मात्र तोच शुद्धतेचा निकष म्हणून सर्वांनी मान्य करावा असा आग‘ह साफ चुकीचा आहे. आपल्या मातृभाषेचा आपल्याला विनासायास मिळालेला वारसा आपण कळत नकळत जोपासत असतो आणि पुढील पिढीकडे अभिमानाने सोपवत असतो; त्यामध्ये आपल्या भाषेविषयीच्या आपल्या समजुती, त्या... Continue Reading →

कोविड आणि महिला

कोविडकाळामध्ये जनजीवन विस्कळीत झाले. आबालवृद्ध, श्रीमंत-गरीब, स्त्री-पुरुष, सुशिक्षित-अशिक्षित; थोडक्यात, समाजातील सर्वच घटकांवर त्याचा कमी-अधिक परिणाम झाला. यातही महिलांवर नेमका कसा आणि काय परिणाम झाला ह्याचा नुकत्याच झालेल्या महिला-दिनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊ या. कोविडमुळे शाळा बंद झाल्यामुळे मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान झाले हे आपल्याला माहीत आहेच. त्याचा अजूनही एक मोठा परिणाम झाला.मुलींचे लग्न लवकर होण्याची शक्यता वाढली.... Continue Reading →

कोविड एक संकट तर आहेच, पण त्या निमित्तानं…

ही कहाणी आहे सिरसी गावच्या दोन तरुणांची. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील सिरसी हे साधारण 15,000 लोकवस्तीचं गाव. गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचं साधन प्रामु‘यानं शेती किंवा दुसर्‍याच्या शेतात मजुरी. नाही म्हणायला गावातील पुढच्या पिढीतली मुलं उच्चशिक्षण घेऊन नोकरीसाठी म्हणून गावाबाहेर पडली आहेत. इथपर्यंत सगळं इतर गावांमध्ये असतं तसंच. ह्या सगळ्याला कलाटणी मिळाली ती कोरोनामुळे.टाळेबंदीमुळे शहरात नोकरी करत... Continue Reading →

मूल नावाचं सुंदर कोडं

शोभाताई भागवत ह्यांना 2020 सालचा ‘मालतीबाई दांडेकर पुरस्कार’ पालकनीतीच्या संपादक डॉ.संजीवनी कुलकर्णी ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्याबद्दल आपण मागील महिन्याच्या अंकात वाचले.पुरस्कार सोहळ्यात बोलताना डॉ.संजीवनी कुलकर्णी ह्यांनी आपल्या मनोगताला ‘मूल नावाचं सुंदर कोडं’ ह्या शोभाताईंच्याच पुस्तकाचे नाव दिले. या अंकात वाचू त्यांचे हे मनोगत... कुठलंही मूल सुंदर कोडं तर असतंच; पण त्या सुंदरतेचा आपल्याला अंदाज... Continue Reading →

संवादकीय – मार्च २०२१

जग समतावादी व्हावं ते फक्त 8 मार्चपुरतं नाही, तर सतत आणि कायमचं.या संदर्भात समाज, राष्ट्र आणि विश्व म्हणून गेल्या काही शतकांत आपण निश्चितच काही प्रगती केली आहे.अर्थात, आणखी बरीच मजल मारायची आहे, याची जाणीव या निमित्तानं सर्वांनाच व्हावी हा या साजरीकरणामागचा हेतू असतो.या प्रगतीबद्दल कौतुक आणि प्रोत्साहन वगैरे गृहीत आहे, पण आता हे सगळं बास.... Continue Reading →

पाठशाला भीतर और बाहर

शिक्षणाप्रति आस्था असणार्‍या व्यक्ती, संस्थांना ‘शिक्षण’ ह्या विषयावर वैचारिक आदानप्रदान करण्यासाठी अझीम प्रेमजी विद्यापीठाने ‘पाठशाला भीतर और बाहर’ हा मंच उपलब्ध करून दिला आहे. ह्या हिंदी द्वैवार्षिकात शिक्षणक्षेत्रात कार्यरत व्यक्ती आपले अनुभव, विचार व्यक्त करतात. एकमेकांच्या अनुभवाचा फायदा होऊन कामाला अधिक खोली यावी, काम अधिकाधिक अर्थपूर्ण होण्यास मदत मिळावी, हा ह्यामागचा उद्देश. ह्या अंकांमध्ये शालेय... Continue Reading →

कृती-कामातून शालेय शिक्षण

आजच्या संदर्भात ह्याकडे कसे बघावे? 18 फेब्रुवारी 1939 च्या ‘हरिजन’मध्ये महात्मा गांधींनी शिक्षक-प्रशिक्षणार्थींबरोबर केलेल्या चर्चेचा काही भाग छापून आला होता. त्यातील काही मजकूर असा: ‘‘आपल्या शिक्षणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची गरज आहे. मेंदूचे शिक्षण हाताच्या माध्यमातून व्हायला हवे.मी कवी असतो, तर पाच बोटांमुळे काय काय घडू शकते, यावर काव्य करू शकलो असतो.मनालाच एवढे महत्त्व?हात-पाय जणू... Continue Reading →

करकोचा आणि कासव

उन्हाळ्यात आपली तहान भागवायला परदेशी गेलेले करकोचे स्थलांतर करण्यासाठी उडता उडता वेळासच्या किनार्‍यावर थांबले होते.एक पिटुकला करकोचा हिंडत असताना त्याला अचानक एक पंधरा-सोळा वर्षांची कासवीण भेटली.ती आपल्याशी बोलेल असे पिल्लू-करकोच्याला आधी वाटलेच नव्हते; पण तिनेच बोलायला सुरुवात केल्यावर त्याचा नाईलाज झाला. ‘‘स्थलांतर सुरू दिसतंय.’’ ‘‘हो ना, तशी पद्धतच आहे आमच्यात.’’ पिल्लू-करकोच्याच्या मनात नव्हते तरी उडण्याचा... Continue Reading →

रंग माझा वेगळा

कमी, हळू, खरे या मालिकेतील हा शेवटचा लेख. आपल्या आयुष्यातील विविध पैलूंना ही त्रिसूत्री कशी लागू पडते हे आपण गेले काही महिने पाहिलेच आहे.त्यातलाच एक पैलू म्हणजे ‘फॅशन’ आणि त्यासोबत येणारी सौंदर्यप्रसाधने, आभूषणे इत्यादी. फॅशन म्हणजे एखादी गोष्ट करण्याची पद्धत.तसेच या शब्दाचा दुसरा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याची सध्याची, ‘लेटेस्ट’, पद्धत.अर्थातच, या व्याख्येतच सतत बदल... Continue Reading →

प्लूटो

मुलांना वाचायला कुठलं सकस साहित्य द्यावं ह्याचा मुलांच्या वयोगटानुसार विचार करायला लागतो. सहसा कुठल्याही घरात डोकावलं, तर कपाटात कमी-अधिक प्रमाणात मराठी-इंग्रजी पुस्तकं बघायला मिळतात. मुलांची भाषिक तसेच सांस्कृतिक जाण वाढवायची असेल, तर त्यांना इतर भाषांतील साहित्याचाही परिचय करून द्यायला हवा. त्या दृष्टीनं ‘इकतारा’ प्रकाशनाच्या ‘प्लूटो’ ह्या हिंदी द्वैमासिकाचा आवर्जून उल्लेख करायला हवा.  अगदी लहान, म्हणजे... Continue Reading →

संवादकीय – फेब्रुवारी २०२१

कोविड अजून पार नाहीसा झालेला नाही, कदाचित इतक्यात होणारही नाही; पण बर्‍याच अंशी नियंत्रणाखाली आलाय येवढे खरे. अर्थात, त्याने पुन्हा डोके वर काढू नये म्हणून मास्क, सहा फूट अंतर आणि हात वारंवार धुणे यात सैलपणा येऊ देऊ नका. कोविडच्या निमित्ताने मध्यमवयीन सुखवस्तू लोकांच्या आयुष्यात मजेशीर बदल घडले. त्यांच्या रोजमर्रा धकाधकीच्या जीवनाचा वेगच कमी झाला. शिस्तीची... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑